Video : अकोल्यात रात्री आकाशात दिसले आगीचे गोळे, नेमका काय आहे हा प्रकार?

| Updated on: Apr 03, 2022 | 3:34 PM

अकोला जिल्हातल्या अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात (In the camera of the mobile) उल्कापात कैद केला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमकं काय आहे हे समजू शकले नाही. उल्कापातचे व्हिडीओ व्हायरल होत […]

अकोला जिल्हातल्या अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात (In the camera of the mobile) उल्कापात कैद केला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमकं काय आहे हे समजू शकले नाही. उल्कापातचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हातल्या अनेक भागात अनेकांनी उल्कापात पाहिल्याचा दावा केला आहे. अकोल्यात काल सायंकाळी अंधार पडला. आकाश अगदी निरभ्र होता. अशातच अचानक आकाशात उत्तरेकडून दक्षिणकडे (from north to south) जाणारे आगीचे गोळे दिसले. केवळ अकोला शहरातच नव्हे तर जिल्ह्यांमध्येही असाच नजारा पहावयास मिळाल्याची वार्ता पसरली. व्हिडीओ व्हायरल झाला.

 

 

Published on: Apr 03, 2022 03:33 PM
Video : Raj Thackeray यांच्या ‘त्या’ विधानाशी 200 टक्के सहमत – चंद्रकांत पाटील
Video : मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, पाहा व्हीडिओ…