ATM Theft | एटीएम लुटीचा डाव फसला, डोंबिवलीत चोरटा गजाआड
काही सतर्क नागरिकांना चोराची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांना त्याच्या दुष्कृत्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि चोर यांच्यात चांगलाच पकडा-पकडीचा खेळ रंगला.
डोंबिवली (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत चोरांचा प्रचंड सुळसुळाट बघायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून चोरांनी घरं-दुकानांना लक्ष्य केले आहे. ‘हेही असे की थोडके’ त्यांचं धाडस आता थेट एटीएम मशीन फोडून पैसे लंपास करण्यापर्यंत पोहोचलं आहे. डोंबिवलीत तर मंगळवारी (7 सप्टेंबर) मध्यरात्री एका चोरट्याने तब्बल दोन एटीएम मशीन फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने त्याचा तो प्रयत्न हाणून पडला. काही सतर्क नागरिकांना चोराची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांना त्याच्या दुष्कृत्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि चोर यांच्यात चांगलाच पकडा-पकडीचा खेळ रंगला. अखेर पोलिसांना या चोराच्या मुसक्या आवळण्यात यश आलं. डोंबिवलीच्या टिळकनगर परिसरात रात्रभर हा सगळा थरार सुरु होता.