Nagpur | वीजबिल वसुली कर्मचाऱ्यावर रॉडने हल्ला, नागपुरातील धक्कादायक प्रकार
वीजबिल थकित ठेवणाऱ्या कुटुंबाचे वीज कनेक्शन तोडायला गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. नागपूरच्या भेंडे ले-आऊट परिसरातील इंद्रप्रस्थ नगरमध्ये ही घटना घडली. महावितरणचे कर्मचारी आणि युनियन पदाधिकारी सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.
वीजबिल थकित ठेवणाऱ्या कुटुंबाचे वीज कनेक्शन तोडायला गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. नागपूरच्या भेंडे ले-आऊट परिसरातील इंद्रप्रस्थ नगरमध्ये ही घटना घडली. महावितरणचे कर्मचारी आणि युनियन पदाधिकारी सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनियन आक्रमक झाली असून हल्ल्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. या हल्ल्यात महावितरणचे तंत्रज्ञ सुखदेव केराम हे गंभीर जखमी झाले आहेत.