Special Report | रोहिणी खडसेंवर हल्ला, खडसे-पाटलांमध्ये वॉर

| Updated on: Dec 28, 2021 | 8:52 PM

 रोहिणी खडसेंवरील हल्ल्या वरुन एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसेंवर हल्ला झाला असला तरी मी त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांकडून हल्ला झाला होता. रोहिणी खडसेंवरील हल्ल्या वरुन एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसेंवर हल्ला झाला असला तरी मी त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. दोन दिवसांपुर्वी मी ऑडिओ क्लिप जारी केल्या. ते आणि हल्ला करणारे हे एकच असून गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. महिलांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

महिलांवर हल्ला करणारे कोण, विनयभंग करणारे कोण या गुंड प्रवृत्तीच्या लोक चौकशी झाली पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले. हा कसला शिवसेनेचा आमदार असा सवाल एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविषयी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जागेचा त्याग केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील आमदार झाला आणि आता स्वत: ला शिवसैनिक म्हणून घेतो, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Published on: Dec 28, 2021 08:52 PM
Video | चोरी करायला गेलेल्या चोराला मिळालं विचित्र सरप्राईज, नेमकं काय घडलं?
Video | आफ्रिकन शेळ्यांची लाखोंमध्ये विक्री, नाशकात कुणी घेतली आफ्रिकन शेळी?