VIDEO : सलग तिसऱ्या दिवशी Nitesh Rane यांची Kankavli पोलीस स्थानकात हजेरी
जिल्हा बँकेचं राजकारण नितेश राणे आणि संतोष परब हल्लाप्रकरणामुळे चांगलंच तापलं होतं. अटकेची कारवाई नितेश राणेवर होणार, अशी कुजबूज सुरु होती. अनेक दिवस गायब असलेले नितेश अचानकपणे समोर आले. आमदार नितेश राणे हे गेल्या तीन दिवसांपासून सलग कणकवली पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर होत आहेत.
जिल्हा बँकेचं राजकारण नितेश राणे आणि संतोष परब हल्लाप्रकरणामुळे चांगलंच तापलं होतं. अटकेची कारवाई नितेश राणेवर होणार, अशी कुजबूज सुरु होती. अनेक दिवस गायब असलेले नितेश अचानकपणे समोर आले. आमदार नितेश राणे हे गेल्या तीन दिवसांपासून सलग कणकवली पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर होत आहेत. जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई हायकोर्ट या दोन्ही ठिकाणी नितेश राणेंचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, उद्या (27 जानेवारी) सुप्रीम कोर्टात त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार आहे. आता नेमकं उद्या याप्रकरणी काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.