शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेऊ नये म्हणून हालचाली सुरू, ठाकरे गटाकडून कोणता नवा प्लान?

| Updated on: Feb 28, 2023 | 6:47 PM

VIDEO | मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर ठाकरे गटाचा पहारा, शिंदे गटानं कार्यालय ताब्यात घेऊ नये म्हणून कोणत्या हालचाली सुरू?

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर सोमवारी मुंबईतील विधिमंडळ पक्ष कार्यालय शिवसेना पक्षाने गमावले होते. यानंतर आता मुंबई महापिलेकेतील शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर पक्ष कार्यालयाच्या दर्शनीभागावरील धनुष्यबाण चिन्ह लावण्यात आले. मात्र ते देखील झाकण्यात आले आहे. जेणेकरून हे कार्यालय ठाकरे गटाचे आहे, असा दावा करण्यात येईल. या कार्यालयावर ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या माध्यामातून विशेष पहारा देखील ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयापूर्वी दोन गटात वाद झाल्याने हे कार्यालय सील करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले होते. मात्र आता निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शिंदे गट पालिकेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करु शकतं अशी शंका ठाकरे गटाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून या कार्यालयावर पहारा दिला जात आहे.

Published on: Feb 28, 2023 06:47 PM