Breaking : उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या संमतीने नारायण राणेंना अटक, भाजपची पहिली रोखठोक प्रतिक्रिया

| Updated on: Aug 25, 2021 | 9:11 AM

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केल्यानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोमवारी रात्रीच फोनाफोनी झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी नारायण राणेंवर कारवाई करण्यावर जोर दिला होता, अशी माहिती समोर येतीय.

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केल्यानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोमवारी रात्रीच फोनाफोनी झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी नारायण राणेंवर कारवाई करण्यावर जोर दिला होता. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा नारायण राणेंच्या अटकेबाबत निर्णय झाला. त्यानुसार मंगळवारी 24 ऑगस्टला नारायण राणेंवर अटकेची कारवाई झाली. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम संमती नंतरच राणेंवर अटकेची कारवाई करण्याचा निर्णय झाला, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे

यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही अटक सूडबुद्धीने आणि राजकीय हेतूने आहे, असं आम्ही कालच सांगत होतो, आता ते समोर आलंय, असं अतुल भातखळकर म्हणाले.

Kirit Somaiya | छगन भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता जप्त, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा
Nana Patole | राणेंची तब्येत बरी नसेल तर राज्य सरकार त्यांच्यावर उपचार करेल : नाना पटोले