संजय राऊत डोक्यावर पडलेले…, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
राज ठाकरे दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे चार दिवसांपूर्वीदेखील दिल्लीला गेले होते. तर आज अमित शाह यांची भेट घेतली या भेटीवरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली होती.
मुंबई, १७ मार्च २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजप युतीचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्याचसाठी राज ठाकरे दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे चार दिवसांपूर्वीदेखील दिल्लीला गेले होते. तर आज अमित शाह यांची भेट घेतली या भेटीवरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांचं विभाजन करण्यासाठी अमित शाहांचे कितीही मनसुबे असले तरी महाराष्ट्राची जनता हे मनसुबे सहन करणार नाही, असे राऊत म्हणाले. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांवर हल्ला चढवलाय. ‘संजय राऊत यांनी आधी महाभकास आघाडीच्या जागावाटपाचा बघावं. वंचित बरोबर काही जमतंय का बघा. संजय राऊत डोक्यावर पडलेले ग्रहस्थ आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. तर यावेळी महाराष्ट्रात 45 + लोकसभेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत नक्की येतील’, असा विश्वासही भातखळकर यांनी व्यक्त केला.