Atul Londhe | देवेंद्र फडणवीस स्वप्नातून बाहेर येण्यास तयार नाहीत : अतुल लोंढे

| Updated on: Oct 12, 2021 | 8:56 PM

भारतीय जनता पक्ष सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असा खोचक सल्ला लोंढे यांनी फडणवीसांना दिलाय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय. फडणवीस दोन वर्षानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नरंजनातच मग्न, असं लोंढे म्हणाले.

भारतीय जनता पक्ष सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असा खोचक सल्ला लोंढे यांनी फडणवीसांना दिलाय.

भाजपमध्ये कोण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, तर कोणाला आपलाच नंबर आहे असे वाटते. पण देवेंद्र फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडायला तयार नाहीत. यातून भाजपातील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांनी काय तो बोध घ्यावा. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे. जनता भाजपला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावे अशी कोपरखळीही लोंढे यांनी लगावली आहे.

Published on: Oct 12, 2021 07:47 PM
Latur | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, मागणीसाठी भाजपचे 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन
36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 12 October 2021