संसदेत महाराष्ट्र, शिवरायांचा अपमान सुरु असताना भाजपचे मंत्री, खासदार बाक वाजवत होते- अतुल लोंढे
भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत म्हणून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुतळे जाळत आहेत.
मुंबई: भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत म्हणून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुतळे जाळत आहेत. संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरु असताना महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री आणि खासदार बाक वाजवत होते. त्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही, असा घणाघात अतुल लोंढे यांनी केला आहे.