आम्ही त्यांना गोळ्या झाडणार… सुजय विखे आणि निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांच्या फोन कॉल व्हायरल

| Updated on: Apr 08, 2024 | 3:09 PM

पारनेर तालुक्यातील कळस गावातील प्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. इतकंच नाहीतर सुजय विखेंना गोळ्या घालण्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. मात्र टिव्ही-९ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

अहमदनगरमधील भाजप उमेदवार सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सुजय विखेंचं समर्थन करणारे माजी उपसरपंच गणेश काने यांना धमकी आणि शिवीगाळ केल्याची माहिती मिळतेय. शिव्या देणारा व्यक्ती निवृत्ती गाडगे ऊर्फ नाना निलेश लंके यांचा समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे. पारनेर तालुक्यातील कळस गावातील प्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. इतकंच नाहीतर सुजय विखेंना गोळ्या घालण्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. मात्र टिव्ही-९ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मतदारसंघातील दोन उमेदवार समर्थकांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुजय विखे आणि संबंधित कार्यकर्त्याला संरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Published on: Apr 08, 2024 03:09 PM
संजय राऊत बांग देणारा कोंबडा, भाजप नेत्याची खोचक टीका
शिंदेंना मावळ्याचा सरदार आणि सरदारचा जाहागीरदार कुणी केलं? ‘त्या’ टीकेवर वडेट्टीवारांचा सवाल