जायकवाडी धरणात 14 हजार क्यूसेक्सने आवक सुरू, 400 गावांचा प्रश्न मिटला

| Updated on: Sep 13, 2021 | 9:35 AM

नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्यापावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याशिवाय नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. यामुळे जायकवाडी धरणात 14 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

मराठावाड्यातील महत्वाचं धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात 14 हजार क्यूसेकची आवक सुरू आहे.  नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्यापावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याशिवाय नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. यामुळे जायकवाडी धरणात 14 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा पोचला 56 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे औरंगाबाद जालना सह चारशे गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.  आवक कायम राहिल्यास पुढील एका महिन्यात जायकवाडी धरण भरणार असल्याची माहिती आहे. पाण्याची आवक वाढली तर अल्पावधीतच होणार जायकवाडी धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.  जायकवाडी धरण 56 टक्के भरल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. तर औरंगाबादमध्येही मुसळधार पाऊस होत आहे. अंजिठा लेणी परिसरात देखील  जोरदार पाऊस होत आहे.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 13 September 2021
Sanjay Rathod | मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून राजीनामा दिला : संजय राठोड