Video : औरंगाबादच्या कन्नड शहरात बॉम्ब आढळला, एकच खळबळ…

| Updated on: Jun 09, 2022 | 4:20 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात (Kannad Bomb) ज्या वस्तूनं पोलिसांपासून सामान्यांपर्यंत घबराहट निर्माण केली होती, ती अखेर बॉम्बच असल्याचं निष्पन्न झालं आहे. आज सकाळपासूनच कन्नड शहरात मोठी खळबळ माजली आहे. शहरातील एका फर्निचर दुकानात (Furniture shop) बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने गोंधळ उडाला. फर्निचर दुकानदाराने दुकान उघडलं तेव्हा त्याला एक मोबाइलचा बॉक्स दिसला. हा अनोळखी बॉक्स दिसल्यानं त्यांनी तो […]

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात (Kannad Bomb) ज्या वस्तूनं पोलिसांपासून सामान्यांपर्यंत घबराहट निर्माण केली होती, ती अखेर बॉम्बच असल्याचं निष्पन्न झालं आहे. आज सकाळपासूनच कन्नड शहरात मोठी खळबळ माजली आहे. शहरातील एका फर्निचर दुकानात (Furniture shop) बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने गोंधळ उडाला. फर्निचर दुकानदाराने दुकान उघडलं तेव्हा त्याला एक मोबाइलचा बॉक्स दिसला. हा अनोळखी बॉक्स दिसल्यानं त्यांनी तो उघडून पाहिला असता त्यात बॉम्बसारखी वस्तू आढळली. ते पाहून दुकानदाराची गाळण उडाली. त्यांनी तत्काळ यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली. कन्नड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला. बॉम्बशोधक पथकाला (Bomb Squad) पाचारण केलं. या पथकाचं काम पूर्ण होईपर्यंत शहरातील नागरिक आणि पोलिसांनी अक्षरशः श्वास रोखून धरला होता.

संजय राऊतांना 4 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
Video : तो फोटो जुना, आता माझे केस पांढरे झालेत- चंद्रकांत खैरे