लाच प्रकरणी मराठवाडा विद्यापिठातील विभागप्रमुख निलंबित होणार?
औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (BAMU) शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला भडंगे (Dr. Ujjwala Bhadande) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे.
औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (BAMU) शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला भडंगे (Dr. Ujjwala Bhadande) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (Dr. Pramod Yewle) यांनी यासंदर्भातील अश्वासन पत्राकारांसमोर दिले असून तसे लेखी पत्रही तत्काळ काढण्यात येईल, असे सांगितले आहे. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीला 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून यासंदर्भातील ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. विद्यापीठातील अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी सर्व पक्षीय संघटनांनी आज तीव्र आंदोलन केले.
Published on: Mar 31, 2022 02:49 PM