औरंगाबादमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव, परदेशातून आलेल्या दोघांना लागण

| Updated on: Dec 26, 2021 | 10:59 AM

ओमिक्रॉनने आता औरंगाबादमध्ये देखील शिरकाव केला आहे. इंग्लंड आणि दुबईवरून आलेल्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉनची पसरण्याची क्षमता अधिक असल्याने खबरदारी घेतली जात आहे. अखेर ओमिक्रॉनने आता औरंगाबादमध्ये देखील शिरकाव केला आहे. इंग्लंड आणि दुबईवरून आलेल्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध अधिक कडक करण्यात आले असून, साधा सर्दी, खोकला असला तरी देखील रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे.

शिवसैनिकाची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी, तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच निधन
राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीला परवानगी, लांडेवाडीत होणार पहिली शर्यत