Aurangabad | नोकरी गेली म्हणून उच्च शिक्षित तरुणांकडून मत्स्य शेती, कमावलं लाखोंचं उत्पन्न
औरंगाबाद जिल्ह्यातील दुधड गावातील उच्च शिक्षित तरुणांची लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर थेट आपलं गाव गाठून मत्स्य शेतीला सुरुवात केली. अगदी एक वर्षापूर्वीच बेरोजगार झालेल्या या दोन्ही तरुणांनी मत्स्य शेतीच्या माध्यमातून 8 महिन्यात तब्बल 10 लाख रुपयांचं उत्पन्न कमावलं आहे.
कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं. कोरोना संसर्गाचा वेग मंदावण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लावलं. या काळात अनेकांचा रोजगार गेला. उच्चशिक्षितांच्या नोकऱ्या गेल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील दुधड गावातील उच्च शिक्षित तरुणांची लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर थेट आपलं गाव गाठून मत्स्य शेतीला सुरुवात केली. अगदी एक वर्षापूर्वीच बेरोजगार झालेल्या या दोन्ही तरुणांनी मत्स्य शेतीच्या माध्यमातून 8 महिन्यात तब्बल 10 लाख रुपयांचं उत्पन्न कमावलं आहे.
स्वतःच्या शेतात असलेल्या शेततळ्यात मत्स्यबीजे सोडून त्यांनी हे उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. साईनाथ चौधरी आणि सूरज राऊत अशी या दोन्ही तरुणांची नावे आहेत. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर निराश न होता त्यांनी नव्या उमेदीने मत्स्यशेतीच्या व्यवसायाला सुरवात केली आणि केवळ 8 महिन्यात जवळपास 10 लाखांचं उत्पन्न कमावलं.
Published on: Jun 17, 2021 11:40 AM