Aurangabad | रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी एकाच रात्री 4 दुकाने फोडली, शिवाजीनगरमधील घटना

| Updated on: Aug 19, 2021 | 10:03 AM

रिक्षामधून आलेल्या चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने उचकटून रोख रक्कम आणि दुकानातील साहित्य लंपास केले. औरंगाबादमधील पुंडलीकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर भागात बुधवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. चोरी होताना आरडाओरड झाल्यामुळे चोरटे पुन्हा रिक्षातून पसार झाले.

रिक्षामधून आलेल्या चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने उचकटून रोख रक्कम आणि दुकानातील साहित्य लंपास केले. औरंगाबादमधील पुंडलीकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर भागात बुधवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. चोरी होताना आरडाओरड झाल्यामुळे चोरटे पुन्हा रिक्षातून पसार झाले. लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र वृत्त देईपर्यंत दुकानदारांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे, ते स्पष्ट होऊ शकले नव्हते.

शिवाजीनगर भागातील सद्गुरु एम्पोरियम, पूनम एनर्जी पवार, आय केअर सेंटर अशा एकूण चार दुकानांना रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी लक्ष्य केले. या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील रोख आणि विक्रीचे साहित्य लंपास केले.

Pune | पोलीस व्हेरीफिकेश मिळत नसल्याने पुण्यात सुरेश पिंगळे यांचं टोकाचं पाऊल
Satara | मद्य पिण्याचा अट्टहास, व्यसनमुक्ती केंद्रावर आलेल्या मद्यपीचा विजेच्या टॉवरवर धिंगाणा