Aurangabad | औरंगाबादच्या जडगावामध्ये कार तलावात कोसळून चौघे ठार

| Updated on: Oct 12, 2021 | 6:11 PM

जिल्ह्यातील करमाड परिसरातील (Karmad car Accident) जडगाव येथील सिमेंटच्या बंधाऱ्यात भरधाव वेगाने येणारी कार कोसळल्याची घटना घडली आहे.

जिल्ह्यातील करमाड परिसरातील (Karmad car Accident) जडगाव येथील सिमेंटच्या बंधाऱ्यात भरधाव वेगाने येणारी कार कोसळल्याची घटना घडली. ही कार एवढ्या जास्त वेगाने येऊन थेट बंधाऱ्यात कोसळली की त्यातील सर्व प्रवासी बुडाले. करमाडच्या जवळच असलेल्या जडगाव येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अजूनही या कार आणि प्रवाशांचा शोध घेणे सुरूच आहे.

दोन तास उलटूनही शोध लागला नाही

दरम्यान ही घटना घडल्याबरोबर परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारीही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेतील प्रवाशांचा पाण्यात उतरून शोध घेणे सुरु झाले. मात्र तब्बल एक तासभर पाण्यात कार आणि प्रवाशांचा शोध घेतल्यानंतरही त्यांचा पत्ता लागला नाही. करमाड येथील हा सिमेंटचा बंधारा खूप मोठा असून अजूनही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा तेथे शोध घेणे सुरू आहे. मात्र एवढ्या वेगाने आलेली कार बंधाऱ्यात पडल्यानंतर बहुधा यातील प्रवासी मृत पावले असण्याची शक्यता आहे.

Bala Nandgaonkar | दोन नेते एकत्र आले की चर्चा तर होणारच, फडणवीसांच्या भेटीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 12 October 2021