Aurangabad | औरंगाबादेतील लेबर कॉलनीवरआज हातोडा पडणार, घरं रिकामी करण्याचे शासनाचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लेबर कॉलनी (Aurangabad labor colony ) वसाहतीवर महापालिका आज बुलडोझर फिरवणार आहे.
औरंगाबादः जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लेबर कॉलनी (Aurangabad labor colony ) वसाहतीवर महापालिका आज बुलडोझर फिरवणार आहे. अवैध मालकी आणि जीर्ण वसाहती या दोन कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 31 ऑक्टोबर रोजी येथील रहिवाशांना आठ दिवसात घरे रिकामी करण्याची नोटीस दिली होती. ही डेडलाइन आज संपत असून आता 10.30 वाजता महापालिका काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शासनाने अगदी कमी कालावधीच्या नोटिसीवर घरे रिकामी करण्याची नोटीस लावली असून कोणतीही कायदेशीर याचिकाप्रक्रिया करायला वेळ दिला नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.