Aurangabad | MIM नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत, धार्मिक स्थळांना भेटी, ओवैसींना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
मनसेनं हिंदुत्वाची आग्रही भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही जाहीर सभा औरंगाबादेत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता अकबरुद्दीन ओवैसी काय वक्तव्य करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
औरंगाबादः एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांचं औरंगाबादमध्ये कालच आगमन झालं असून आज ते शहरातील विविध धार्मिक स्थळांना ते भेटी देत आहेत. अकबरुद्दीन ओवैसी हे तेलंगणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष असून याच माध्यमातून औरंगाबादमध्ये (Aurangabad MIM) एक शाळेची उभारणी करण्यात येणार आहे. या शाळेच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत आले असून एमआयएमने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी तर ‘आ रहा हू मै…’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकून ओवैसी यांच्या औरंगाबाद दौऱ्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर शहरात ओवैसी यांच्या दौऱ्याची चांगलीच वातावरणनिर्मिती करण्यात आली. आज अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबदमध्ये दाखल झाले असून त्यांच्या स्वागताला शेकडो कार्यकर्ते हजर झाले. दुपारी चार वाजता त्यांच्या ट्रस्टच्या शाळेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.