Aurangabad | औरंगाबादेत MRA लॉजिस्टिक कंपनीच्या मालकाची कामगाराला मारहाण
औरंगाबाद उद्योग जगतातील गुंडगिरीनंतर आता उद्योजकांच्या दादागिरीचे प्रकरण समोर आले आहे. एका उद्योगपतीकडून कामगाराला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एम आर ए लॉजीस्टिक कंपनीच्या मालकाने कामगाराला मारहाण केली आहे. काम का देत नाही असं विचारायला गेलेल्या कामगाराला मालकाने मारहाण केल्याची घटना घडली.
औरंगाबाद उद्योग जगतातील गुंडगिरीनंतर आता उद्योजकांच्या दादागिरीचे प्रकरण समोर आले आहे. एका उद्योगपतीकडून कामगाराला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एम आर ए लॉजीस्टिक कंपनीच्या मालकाने कामगाराला मारहाण केली आहे. काम का देत नाही असं विचारायला गेलेल्या कामगाराला मालकाने मारहाण केल्याची घटना घडली. राजू फकिरचंद हिरेकर असं मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे तर मुकेश शरावत असं मारहाण करणाऱ्या कंपनी मालकाचे नाव आहे. मारहाण प्रकरणी कामगाराची वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.