Aurangabad | औरंगाबाद मधील क्रांती चौकात मध्यरात्री शिवप्रेमी आक्रमक, बॅनर हटवल्याचं प्रकरण
काल रात्री शहरातले काही शिवप्रेमींचे बॅनर (banner) महापालिकेने हटवल्याने शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगाबाद (aurangabad) शहरातल्या क्रांती चौकात बॅनर लावण्यात आले होते.
काल रात्री शहरातले काही शिवप्रेमींचे बॅनर (banner) महापालिकेने हटवल्याने शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगाबाद (aurangabad) शहरातल्या क्रांती चौकात बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेने रात्री उशिरा बॅनर काढल्याने घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते. गोंधल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांना (police) या प्रकरणाची भणक लागताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कार्यकर्त्यांना तिथून पांगवले आहे. घटनास्थळी रात्री अनेक पोलिस उपस्थित होते. तसेच रात्री तिथं बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.