Aurangabad | थेट दरवाजा तोडला, औरंगाबादेत पोलिसांच्या सर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले
औरंगाबाद येथे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी वेळीच रोखले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घरगुती वादाच्या कारणावरुन ही महिला आत्महत्येचा प्रयत्न करत होती. मात्र, औरंगाबादच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून थेट दरवाजा तोडला आणि महिलेचे प्राण वाचवले.
औरंगाबाद येथे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी वेळीच रोखले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घरगुती वादाच्या कारणावरुन ही महिला आत्महत्येचा प्रयत्न करत होती. मात्र, औरंगाबादच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून थेट दरवाजा तोडला आणि महिलेचे प्राण वाचवले. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले. औरंगाबाद येथील सिडको चिखलठाण्यातील ही धक्कादायक प्रकार आहे. दक्ष पोलीस कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत महिलेचे प्राण वाचवल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.