Aurangabad | औरंगाबादमध्ये नदी नाल्यांना महापूर, गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं
अनेक ठिकाणी गावात आणि घरातही पावसाचे पाणी घुसले. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याला तब्बल दोन तास पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांना अक्षरशः महापूर आला आहे. तर राष्ट्यावरुनही पुरासारखे पाणी वाहिले. अनेक ठिकाणी गावात आणि घरातही पावसाचे पाणी घुसले. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याला तब्बल दोन तास पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे, हवामान विभागाच्या अंदाजानुसार काल सायंकाळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसाचा काढणीस आलेल्या उडीद पिकाला फटका बसणार असून ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनचंही या मुसळधार पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. असाच सलग जर पाऊस पडत राहला तर खरीपाच्या पिकांचं अतोनात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.