Sanjay Raut | मर्दासारखे समोर या, गंजलेल्या बंदुका-तलवारींनी हल्ले करु नका, आम्ही घाबरत नाही : राऊत

| Updated on: Nov 13, 2021 | 10:44 AM

देशातील वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडून औरंगाबादेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राऊत या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यानिमित्ताने ते औरंगाबादमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी अनेक विषयांवर संवाद साधला. राज्यात महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रच काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

शिवसेनेने कधीच मुस्लिमांना ठरवून विरोध केला नाही. शिवसेना ही सर्वसमावेशक असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार आणि आधार कधीही सोडलेला नाही. आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये सर्व जातीधर्मांना स्थान आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. जे या राष्ट्राला आणि मातृभूमीला मानतात, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी औरंगाबादमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

देशातील वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडून औरंगाबादेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राऊत या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यानिमित्ताने ते औरंगाबादमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी अनेक विषयांवर संवाद साधला. राज्यात महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रच काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळे नसून एकच आहेत. शरद पवार हे महाविकासआघाडीचे प्रमुख आहेत, तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ज्यावेळी राज्यासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर महाविकासआघआडीतील तिन्ही पक्ष तो एकत्र मिळून घेतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

36 जिल्हे 50 बातम्या | 13 November 2021
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 13 November 2021