Salman Khan | अभिनेता सलमान खानकडून कोरोना लसीकरणासाठी जनजागृती
राज्य सरकारने एक नवा प्लॅन आखला आहे ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची मदत घेतली जाणार आहे. सलमानच्या मदतीने मुस्लीम बहुसंख्या परिसरांमध्ये लसीकरणाबद्दल जनजागृती केली जाणार आहे.
राज्याने 10 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केलाय. मात्र राज्यात असे काही भाग आहेत जिथे वेगवेगळ्या गैरसमजांमुळे लोकं कोरोनाविरोधी लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेषत: मुस्लीम बहुसंख्या असणाऱ्या भागांमधील नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. यासाठी राज्य सरकारने एक नवा प्लॅन आखला आहे ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची मदत घेतली जाणार आहे. सलमानच्या मदतीने मुस्लीम बहुसंख्या परिसरांमध्ये लसीकरणाबद्दल जनजागृती केली जाणार आहे.
यावर भाष्या करतांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा लसीकरण होते तेव्हा मुस्लिमांमध्ये धार्मिक शंका असते. ज्यामूळे मुस्लीम बहुसंख्या भागांमध्ये लसीकरण दर कमी आहे. सलमान खानसारख्या अभिनेत्यानी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ते (मुस्लिम) लस घेतील अशी आशा आहे.”