मलिकांवर सूडबुद्धीने कारवाई – आव्हाड
नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. मलिक यांच्यावर सूडबुद्धीतून कारवाई करण्यात आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
मुंबई : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला होता. दरम्यान आता या सर्व प्रकरणावर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीतून करण्यात आल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे.