आधी राज ठाकरे यांना इशारा अन् आता स्वागताची तयारी; ‘या’ नेत्याचा विरोध अखेर मावळला

| Updated on: Apr 10, 2023 | 10:08 AM

Raj Thackeray : राज ठाकरेंनी अयोध्येत यावं, आम्ही स्वागतासाठी तयार; आधी इशारा देणाऱ्या भाजपच्या नेत्याकडून आता स्वागताची तयारी. पाहा व्हीडिओ...

अयोध्या : राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोवर त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देणारे भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा विरोध आता मावळला आहे. राज ठाकरे यांना बृजभूषण शरण सिंह यांनी अयोध्येला आमंत्रित केलं आहे. राज ठाकरे यांचं अयोध्येत जल्लोषात आम्ही स्वागत करणार. आमचे त्यांच्याशी मतभेद नाहीत. अयोध्येत न येता राज ठाकरेंनी माझा सन्मान केला. आता त्यांचं अयोध्येत जल्लोषात स्वागत करणार आहे, असं बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे. आमचे महाराष्ट्रातील नेत्यांशी खूप चांगले संबंध आहेत. आम्ही कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून विरोध केले नाही, असंही बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितलं आहे.

Published on: Apr 10, 2023 09:56 AM
सावरकर हे शिंदेंचे दैवत; महाराष्ट्राचं दैवत जगदंबा, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर : वडेट्टीवार
धुळ्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली; पांढऱ्या सोन्याचे भाव वाढले