Ayodhya Ram Mandir : बस प्रभू राम के नाम… १०८ फूट लांब अगरबत्ती अयोध्येत दाखल; रामभक्तही भारावले

| Updated on: Jan 11, 2024 | 5:19 PM

गुजरातच्या वडोदरा मधून १०८ फूट लांब अगरबती अयोध्येत दाखल झाली आहे. भरवाड समजाने तब्बल १०८ फूट लांबीची ही अगरबत्ती बनवली आहे. एका मोठ्या ट्रकमधून ही अगरबत्ती आणण्यात आली आहे. वडोदरातील एका शेतात १० हून अधिक लोखंडी ट्रायपॉड स्टँड लावून ही अगरबत्ती तयार करण्यात आली अन् आता ती अयोध्येत दाखल झाली.

Follow us on

अयोध्या, ११ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येसह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने योगदान देताना दिसतोय. गुजरातच्या वडोदरा मधून १०८ फूट लांब अगरबती अयोध्येत दाखल झाली आहे. भरवाड समजाने तब्बल १०८ फूट लांबीची ही अगरबत्ती बनवली आहे. एका मोठ्या ट्रकमधून ही अगरबत्ती आणण्यात आली आहे. वडोदरातील एका शेतात १० हून अधिक लोखंडी ट्रायपॉड स्टँड लावून ही अगरबत्ती बनवण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर ही अगरबत्ती ट्रकमधून अयोध्येकडे रवाना करण्यात आली. या भल्यामोठ्या सुंगधी अगरबत्तीचे आणि तिला अयोध्येत पाठवण्यासाठी जो ट्रक होता, त्या ट्रकमधून या मोठ्या अगरबत्तीला नेताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.