Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी सुट्टी जाहीर

| Updated on: Jan 18, 2024 | 5:00 PM

22 जानेवारी 2024 रोजी केंद्र सरकारने सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमध्ये दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 22 जानेवारी रोजी अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी हाफ डे मिळणार आहे

Follow us on

मुंबई, १८ जानेवारी, २०२४ : 22 जानेवारी रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी केंद्र सरकारने सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमध्ये दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 22 जानेवारी रोजी अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी हाफ डे मिळणार आहे. केंद्र सरकारकडून हे आदेश देण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. केंद्राकडून प्रसिद्ध कऱण्यात आलेल्या पत्रात असे म्हटले की, कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत असलेली आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेली विनंती विचारात घेऊन केंद्र सरकारने या दिवशी अर्धा दिवसाची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.