Ayodhya Ram Mandir : ऐतिहासिक क्षणांचे व्हा साक्षीदार, अयोध्येतील रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बघा LIVE

| Updated on: Jan 22, 2024 | 12:33 PM

PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE : आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला आपल्या भक्तांवर आशीर्वाद देण्यासाठी अयोध्यानगरी विराजमान होत आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. मोदींच्या आगमनानंतर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा पूजाविधी सुरू करण्यात आली आहे.

अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : रामभक्तांची सुमारे 500 वर्षांची प्रदीर्घ वर्षांची प्रतीक्षा आज संपणार आहे. आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला आपल्या भक्तांवर आशीर्वाद देण्यासाठी अयोध्यानगरी विराजमान होत आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. मोदींच्या आगमनानंतर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा पूजाविधी सुरू करण्यात आली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सात हजारांहून अधिक व्हीव्हीआयपी अयोध्येत दाखल झाले आहेत. यानिमित्ताने बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक सुपरस्टार सध्या अयोध्येत आहेत. रामलल्लाच्या या सोहळ्यानंतर दुपारी दीड वाजता पंतप्रधान मोदी जनतेला संबोधितही करतील. रामलल्ला यांच्या ऐतिहासिक सोहळ्या्या निमित्ताने आज देशातील अनेक राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी बघा पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत असलेला प्रभू रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह…

Published on: Jan 22, 2024 12:32 PM
परळी नगरी झाली राममय, रामलल्लाच्या नामानं मुंडे बंधू-भगिनीतील संघर्ष अन् दुरावा संपला
Ayodhya Ram Mandir : दिग्गज मंडळींसह अयोध्या नगरीत मुकेश अंबानी त्यांच्या पत्नीसह दाखल