जगानेही पाहिला नसेल असा सोहळा…उद्या दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा; व्हा इतिहासाचे साक्षीदार

| Updated on: Jan 21, 2024 | 6:13 PM

ऐतिहासिक सोहळ्याला अवघे काही तास बाकी असल्याने संपूर्ण देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या सज्ज झाली असून राम मंदिरातही जय्यत तयारी सुरू आहे. व्हा इतिहासाचे साक्षीदार

Follow us on

अयोध्या, २१ जानेवारी २०२४ : उद्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला अवघे काही तास बाकी असल्याने संपूर्ण देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या सज्ज झाली असून राम मंदिरातही जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याला मंदिराच्या गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती प्रामुख्याने असणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी सर्वच देशात उत्सुकता असून सर्वत्र राममय वातावरण पाहायला मिळत आहे.