Mumbai Fatkar Morcha | शिवसेना भवनासमोर सेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने
अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेने टीका केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन येथे फटकार मोर्चाचे आयोजन केले होते. याठिकाणी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेने टीका केल्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाने त्याचा निषेध करत दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. यावेळी मोर्चाला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमले. पोलिसांचाही चोख बंदोबस्त याठिकाणी होता. दरम्यान पोलिसांना न जुमानता दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्ये एकमेंकाना भिडले. यामुळे सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.
Published on: Jun 16, 2021 04:25 PM