Ayodhya Ram Mandir : आओ पधारो राम रघुवर….रामलल्ला अयोध्येत विराजमान, बघा लोभस रूपडं

| Updated on: Jan 22, 2024 | 2:15 PM

तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत रामाचं मंदिर बनवण्याचं रामभक्ताचं स्वप्न अखेर आज पूर्ण झालं आहे. अयोध्येत सगळ्यांना जाणं शक्य नसल्याने देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभू श्री रामाचं घरबसल्या दर्शन घेतलं. बघा अयोध्येतील रामाच्या मूर्तीचं लोभस रूपडं....

अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना आज दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी झाली. तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत रामाचं मंदिर बनवण्याचं रामभक्ताचं स्वप्न अखेर आज पूर्ण झालं आहे. अयोध्येत सगळ्यांना जाणं शक्य नसल्याने देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभू श्री रामाचं घरबसल्या दर्शन घेतलं. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामलल्लांचं लोभस रूप पाहण्यासाठी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. ज्यावेळी या रामाचं पहिलं रूप समस्त रामभक्तांच्या नजरेस पडलं त्यानंतर अनेकांनी धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान, रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेंकदाचा मुहूर्त 12 वाजून 29 मिनिटांनी होता. यावेळी मंदिर परिसरात विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. शंखनिनाद करण्यात आला. राममय आणि भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठा झाली.

Published on: Jan 22, 2024 02:00 PM
Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता मोदींची पारंपारिक वेशभूषेत एन्ट्री
Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदींनी कुणाच्या हस्ते सोडला 11 दिवसांचा उपवास?