Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या अयोध्येत घुमणार २ हजार ४०० किलोच्या घंटेचा नाद
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशभरात राममय वातावरण असून प्रत्येक रामभक्तात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक जण आपल्या-आपल्या परिने योगदान देताना दिसतंय. कोणी पंच धातूची ११०० किलो वजनाचा दिवा बनवत आहे. तर कोणी २४०० किलो वजनाच्या घंटाचा नाद संपूर्ण अयोध्येला ऐकवण्याच्या तयारीत आहे
अयोध्या, ११ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशभरात राममय वातावरण असून प्रत्येक रामभक्तात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक जण आपल्या-आपल्या परिने योगदान देताना दिसतंय. कोणी पंच धातूची ११०० किलो वजनाचा दिवा बनवत आहे. तर कोणी २४०० किलो वजनाच्या घंटाचा नाद संपूर्ण अयोध्येला ऐकवण्याच्या तयारीत आहे. अयोध्येतील राम मंदिरात तब्बल २ हजार ४००किलोची घंटा बसवली जाणार आहे. आग्र्याच्या जलसेरा या शहरामधून ही भल्या मोठ्या वजणाची घंटा मागवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घंटेचा आवाज हा जवळपास ३ किलो मीटरपर्यंत ऐकू येणार आहे, असं सांगितलं जातं आहे. सध्या ही घंटा अयोध्येतल्या कारसेवकपुराम या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
Published on: Jan 11, 2024 02:54 PM