अयोध्येत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत खासदार नवनीत राणा यांचेही बॅनर; चर्चाच चर्चा

| Updated on: Apr 08, 2023 | 9:43 AM

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नवनीत राणा यांचे मोठमोठे होर्डिंग पोस्टर्स अयोध्येच्या रस्त्यांवर दिसत आहेत. पाहा व्हीडिओ...

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागताचे ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. शिंदे यांच्यासोबतच खासदार नवनीत राणा यांचेही पोस्टर लावण्यात आले आहेत. अयोध्येच्या शरयू घाटावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार नवनीत राणा यांचे बॅनर आणि पोस्टरही लावण्यात आले आहेत. कालपर्यंत अयोध्येच्या रस्त्यावर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर दिसत होते, मात्र आज अयोध्येच्या रस्त्यांवर खासदार नवनीत राणा यांचे मोठे होर्डिंग्ज आणि बॅनरही दिसत आहेत. “हिन्दू शेरनी, जो प्रभु श्री राम का नहीं, श्री हनुमान का नहीं, वह किसी काम का नहीं!”, असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे.

Published on: Apr 08, 2023 09:43 AM
सरकारला काल कानपिचक्या; आता अजित पवारांचा दौराच रद्द, नेमकं कारण काय?
अन् दादा संपर्क क्षेत्रात! नॉट रिचेबल अजित पवार थेट ‘या’ कार्यक्रमात दिसले