बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट याच घरात शिजला; चाळीचा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणार आरोपींच्या चौकशीत मोठा खुलासा समोर आला आहे. बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी दोघांना देखील मारण्याचे आदेश होते, अशी कबुली आरोपींनी पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीमध्ये दिली. अशातच आता आरोपी राहत असलेल्या चाळीचा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ समोर आला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपीचं नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या करणारे आरोपी २ सप्टेंबरपासून कुर्ल्यात वास्तव्य करत होते. १४ हजार रूपये भाड्याच्या खोलीत हे आरोपी वास्तव्य करत होते. बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा कट कुर्ल्यातील एका चाळीत या चार आरोपींमध्ये शिजला. गेल्या ४० दिवसांपासून हे आरोपी कुर्ल्यातील चाळीत राहून सिद्दीकींच्या ऑफिसची रेकी करत होते. बाबा सिद्दीकींची हत्या केल्यानंतर ते आरोपी प्रत्येकी ५० हजार रूपये वाटून घेणार होते. हरियाणातील कत्तर जेलमध्ये तिघे एकमेकांच्या संपर्कात आले होते. दरम्यान, मुंबईतील कुर्ला येथील पटेल चाळीत आरोपी राहत असलेल्या घराचे फोटो समोर आले आहेत. चाळीत फक्त तीन ते चार घरं आहेत, त्यामुळे आरोपींना पटेल चाळीची राहण्यासाठी निवड केली अशी माहिती देखील समोर येत आहे.