Zeeshan Siddique : ‘मैंने मेरा बाप खोया है, और…’, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक

| Updated on: Oct 25, 2024 | 3:00 PM

मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. पक्षात प्रवेश करताच राष्ट्रवादीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वांद्रे पूर्व या मतदारसंघातून झिशान सिद्दीकींना तिकीट दिलं

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. इतकंच नाहीतर राष्ट्रवादीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वांद्रे पूर्व या मतदारसंघातून झिशान सिद्दीकी यांना विधानसभेची उमेदवारी घोषित केली. दरम्यान, अजित पवार गटात प्रवेश करताच त्यांनी मोठा दावा केला की, पैशासाठी माझ्या वडिलांची हत्या केली. आता काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दबावाखाली काम करत आहे. आम्ही दोघेही निशाण्यावर होतो, मात्र वडिलांनी मला वाचवले. पुढे ते असेही म्हणाले की, मला उमेदवारी मिळणं हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भावनिक दिवस आहे. या कठीण काळात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा आभारी आहे. मला वांद्रे पूर्वेचे तिकीट मिळाले आता मला खात्री आहे की सर्वांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी वांद्रे पूर्व येथून नक्कीच निवडणूक जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Oct 25, 2024 03:00 PM
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
‘मालक मालकच राहिले, मात्र जनतेला…’, शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांचा कोणावर निशाणा?