राजेश टोपे यांना शिवीगाळ? बबनराव लोणीकर यांनी स्वतः ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर केला खुलासा, म्हणाले…

| Updated on: Dec 14, 2023 | 5:08 PM

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून राष्ट्रवादी आमदार राजेश टोपे यांना शिवीगाळ करण्यात आल्याची एक कथित ऑडिओ क्लिप आज चांगलीच सोशल मीडियावर व्हायरल, नागपुरात बबनराव लोणीकर यांना या कथित ऑडिओ क्लिप संदर्भात विचारणा केली असता, काय केला खुलासा?

नागपूर, १४ डिसेंबर २०२३ : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून राष्ट्रवादी आमदार राजेश टोपे यांना शिवीगाळ करण्यात आल्याची एक कथित ऑडिओ क्लिप आज चांगलीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची पाहायला मिळाले. जालना जिल्हा बँकेच्या निवडीवरून बबनराव लोणीकर यांनी ही शिवीगाळ केल्याचे सांगितले जात आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून या क्लिपची tv9 पुष्टी करत नाही. मात्र नागपुरात विधानभन परिसरात बबनराव लोणीकर यांना या कथित ऑडिओ क्लिप संदर्भात विचारणा केली असता, लोणीकर यांनी ती क्लीप खोटी असल्याचे स्पष्टपणे म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, माझी अशाप्रकारची ऑडिओ क्लीप व्हायरल झालेली नाही. मी काहीच असं बोललो नाही. मी ती कोणती क्लीप आहे ती बघेल, ऐकेल आणि मग कोणता निर्णय घ्यायचा हे ठरवले, असे बबनराव लोणीकर यांनी विधानभवन परिसरात प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Dec 14, 2023 05:08 PM
आधी संसदेची रेकी मग घुसखोरी, महाराष्ट्रातील अमोल शिंदे अटकेत; मोठी माहिती उघड
…तर शिंदे यांना हार घालणार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भास्कर जाधव अन् संजय शिरसाट यांच्या जुगलबंदी