अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? काय केला दावा?

| Updated on: Sep 16, 2024 | 1:24 PM

काँग्रेस जवळ माणसं नसेल म्हणून त्यांनी ऑफर दिली असेल, असं मिश्किल वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. जर तुम्ही पंतप्रधान पदासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला पाठिंबा देऊ, अशी ऑफर एका विरोधी नेत्यांनी दिल्याचा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला आहे. पाठिंब्याचा प्रस्तावावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow us on

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार शरद पवार यांच्या सोबत जातील, असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. तर अजित पवार हे येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करणार का? यावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले, ‘जर अजित पवार शरद पवार यांच्या गटात जाणार असतील तर त्यांना तुम्ही आम्ही आडवू शकत नाही. हे राजकारण आहे. कधी कोणाच्या पारड्यात जाऊन बसायचं, कोणासाबोत राहायचं हा त्या-त्या नेत्याचा प्रश्न आहे.’, असे म्हणत बच्चू कडू यांनी यावर फार बोलणं टाळलं. दरम्यान, महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे, अशी चर्चा सुरू असताना यासंदर्भात बच्चू कडू यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. तीन पक्षांचं मिळून महायुती सरकार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई होणार आहे. लाडकी बहीण योजनेवरून स्पर्धा आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजना नेमकी कोणी आणली हे त्यांनाच माहिती आहे आणि ते महायुतीच्या तीनही पक्षातील नेत्यांनी ठरवावं, असं बच्चू कडू म्हणाले.