‘बगलेत दाबाल तर बिचवा…’, महायुतीत बच्चू कडू यांचा पुन्हा एकदा विरोधी राग

| Updated on: Mar 07, 2024 | 10:56 AM

४८ जागांपैकी भाजपच सर्वात मोठा भाऊ असणार हे निश्चित आहे. त्यावरून शिंदेंसह अजित पवार यांचे उमेदवार कमळाच्या चिन्हवर लढू शकतात, असा दावा बच्चू कडू यांनी केलाय. मात्र काहीच दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही शक्यता फेटाळून लावली होती.

मुंबई, ७ मार्च २०२४ : महायुतीचे सहकारी असलेल्या बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा विरोधी राग आळवलाय. संभाव्य जागा वाटपावर शिंदे अजित पवार यांच्या नेत्यांना कमळाचं चिन्ह असेल असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. ४८ जागांपैकी भाजपच सर्वात मोठा भाऊ असणार हे निश्चित आहे. त्यावरून शिंदेंसह अजित पवार यांचे उमेदवार कमळाच्या चिन्हवर लढू शकतात, असा दावा बच्चू कडू यांनी केलाय. मात्र काहीच दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही शक्यता फेटाळून लावली होती. त्यावेळी फडणवीस म्हणाले, आमचे मित्रपक्ष आपपल्या चिन्हावरच लढणार…अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत जागावाटपावर चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, जिथे ज्या पक्षांचे सध्यस्थितीत जे खासदार आहेत. त्यांनाच ती जागा मिळणार हे धोरण नाकारले गेले. तर ज्या उमेदवाराकडे विजयाची क्षमता आहे त्यानुसारच त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे जे विद्यमान १३ खासदार आहेत त्यांना पुन्हा संधीची शक्यता कमी आहे. तर मुंबईतील ६ पैकी ५ जागांवर भाजप स्वतःचे उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 07, 2024 10:56 AM
सुधीर मुनगंटीवार यांचं जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य, जागा कुणी मागितली नाही म्हणून…
लोकसभेसाठी महायुतीच्या 3 राऊंड बैठका अन् 2 फॉर्म्युल्यावर चर्चा, शिंदे अन् दादांना किती जागा?