Bacchu Kadu : बच्चू कडूंना महायुती अन् मविआकडून फोन सुरू, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला? स्पष्टच म्हणाले…
महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते सातत्यानं बंडखोर उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता लहान पक्ष, अपक्ष उमेदवार आणि तिसरी आघाडी काय भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते सातत्यानं बंडखोर उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता लहान पक्ष, अपक्ष उमेदवार आणि तिसरी आघाडी काय भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर तिसऱ्या आघाडीचा कोणाला पाठिंबा असणार? याबाबत आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आम्हाला महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांचे फोन येत आहेत. पण आम्ही पण अपक्ष आणि लहान पक्षांना फोन करत आहोत. हे फोनचं सत्र सुरू आहे. आम्ही पण प्रयत्न करत आहोत की आमचंच सरकार बनलं पाहिजे. अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ’, टिव्ही ९ मराठीशी संवाद साधताना बच्चू कडूंनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू असेही म्हणाले की, एक्झिट पोलवर विश्वास नाही. एक्झिट पोल बोगस असतात. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांना धरून झालेली नाही. देशातच बटेंगे तो कटेंगे, एक है तो सैफ है अशा मुद्द्यावर लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या गोष्टींवर निवडणूक लढवल्या जातात हे चुकीचे आहे. आम्ही काही मूलभूत मुद्द्यांना धरून ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तसं झाल नाही, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.