अमरावतीच्या मैदानात चौरंगी लढत, नवनीत राणांविरोधात बच्चू कडूंचा उमेदवार कोण?
नवनीत राणा यांच्यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राणा यांच्या विरोधात दिनेश बूब यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. लोकांच्या हितासाठी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार दिनेश बूब यांनी केलाय. तर अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अशी विनंती नवनीत राणा यांनी केली
बच्चू कडू यांना प्रहार संघटनेकडून नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बूब यांना त्यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे अमरावतीमध्ये यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. नवनीत राणा यांच्यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राणा यांच्या विरोधात दिनेश बूब यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. लोकांच्या हितासाठी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार दिनेश बूब यांनी केलाय. तर अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अशी विनंती नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू यांना केली. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांचा प्रहार संघटेत प्रवेश केला. २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर दिनेश बूब यांचा दर्यापूरमधून पराभव झाला होता. सर्वच पक्षात दिनेश बूब यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत तर त्यांचं कामही सामाजिक क्षेत्रात जास्त आहे. अमरावतीतील हिंदी भाषिक मतांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांनाच बच्चू कडू यांनी उमेदवारी दिली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट