Video : ईडीपासून वाचण्यासाठी राणा दाम्पत्याचं हनुमान चालिसा- बच्चू कडू
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसावरून (Hanuman Chalisa) वाद सुरू आहे. त्यातल्या त्यात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांची मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा, त्यानंतर झालेला वाद, आणि अटकही बरीच चर्चेत राहिली. त्यातच गुरूवारी नवनीत राणांना हनुमान चालीसा म्हणून दाखवा म्हणाऱ्या तरुणाची ऑडिओ क्लिपही बरीच व्हायरल झाली. तर नवनीत राणा आणि रवी […]
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसावरून (Hanuman Chalisa) वाद सुरू आहे. त्यातल्या त्यात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांची मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा, त्यानंतर झालेला वाद, आणि अटकही बरीच चर्चेत राहिली. त्यातच गुरूवारी नवनीत राणांना हनुमान चालीसा म्हणून दाखवा म्हणाऱ्या तरुणाची ऑडिओ क्लिपही बरीच व्हायरल झाली. तर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या हट्टावरून राज ठाकरे यांनीही जोरदार निशाणा साधला, मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करायला ती काय मशीद आहे का? असा सवला त्यांनी पुण्यातून केला. मात्र आता मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला आहे. ईडीने नोटीस बजावल्यानंतर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हाती घेतला, असे खळबळजनक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.