Bacchu Kadu | ओमिक्रॉन एवढा प्रभावी आणि परिणामकारक ठरेल असं वाटत नाही : राज्यमंत्री बच्चू कडू
“राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, त्यामुळे शाळा बंद करण्याचा प्रश्नच नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय, असं बच्चू कडू म्हणाले.
ओमिक्रॉनचा शाळांवर आणि सरकारवर काही फरक पडणार नाही, असं वक्तव्य शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे. “राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, त्यामुळे शाळा बंद करण्याचा प्रश्नच नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय, असं बच्चू कडू म्हणाले. त्यासोबतच सरकारी चालकाप्रमाणे एसटीच्या चालकाला वेतन मिळावं, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून द्यावं, आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा” असं मत राजमंत्री बंच्चू कडू यांनी व्यक्त केलं. संपामुळे एसटीचं धोक्यात आलीय, एसटीचं नसली तर काय होईल? असा सवालंही त्यांनी उपस्थित केलाय.