Bacchu Kadu on PM | फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही, धोरणं बदलावी लागतील, बच्चू कडूंचं आवाहन
या निर्णयाचं मी स्वागत करतो, हा शेतकऱ्यांचा विजय आहे. हा निर्णय राजकीय दृष्ट्या असला तरी तो शेतकऱ्याच्या प्रचंड आंदोलनाचा आणि त्यांच्या एकतेचा हा विजय आहे. आम्हीही या आंदोलनात सहभागी झालो होतो. आता फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. अनेक धोरणं बदलावी लागतील
“या निर्णयाचं मी स्वागत करतो, हा शेतकऱ्यांचा विजय आहे. हा निर्णय राजकीय दृष्ट्या असला तरी तो शेतकऱ्याच्या प्रचंड आंदोलनाचा आणि त्यांच्या एकतेचा हा विजय आहे. आम्हीही या आंदोलनात सहभागी झालो होतो. आता फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. अनेक धोरणं बदलावी लागतील. त्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. सरकारने नवीन धोरण तयार केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दिली.