कामाख्या देवीच्या दर्शनाला जातांना बच्चू कडूंचा उपरोधिक टोला
शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. एकनाथ शिंदेंसह काही आमदारांनी बुधवारी सकाळी तिथल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. एकनाथ शिंदेंसह काही आमदारांनी बुधवारी सकाळी तिथल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथं त्यांनी पूजासुद्धा केली. दर्शनाला जाताना बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेला उपरोधिक टोला लगावला. “जादूटोणा केलाय ना, म्हणून दर्शनाला चाललोय”, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी शक्तिपीठ असलेल्या कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा केली. कामाख्या देवीचं हे मंदिर भारतातल्या सर्वांत जुन्या मंदिरांपैकी एक आहे. काली आणि त्रिपुरसुंदरीनंतर कामाख्या देवी ही तांत्रिकांसाठी म्हणजे काळी जादू करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं दैवत आहे असं मानलं जातं.
Published on: Jun 29, 2022 01:14 PM