Bacchu Kadu : ‘…तर त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला, तडीपार करा’, बच्चू कडूंचा संताप, कोणत्या मुद्द्यावरून भडकले?
शरद पवार हेच आता अजित पवार यांच्यासोबत जातील असं वाटतंय, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना बच्चू कडू यांनी हा खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.
कुणाल कामराचं प्रकरण सध्या महाराष्ट्रात चांगलंच वादाचं ठरतंय. कुणाल कामरावर काही ठिकाणी गुन्हे देखील दाखल होत असताना अनेक धमकीचे कॉल सुद्धा येत असल्याची माहिती आज समोर आली. यासंदर्भात बच्चू कडू यांना सवाल केला असताना त्यांनी आपली स्पष्टच भूमिका मांडली. ‘तो तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता. देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचा माणूस होता. पण त्यानेच असं बोलावं हे अतिशय वाईट आहे. कोणताही महापुरूष एखाद्या जाती-धर्मापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी सर्व जाती-धर्मासाठी काम केलंय. जात तर माणसानं लावली’, असं बच्चू कडू म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘अशा पद्धतीने बोलणं हा महाराष्ट्र द्रोह असून देशाचाही द्रोह आहे. त्यामुळे त्याला काही दिवस महाराष्ट्राबाहेर हाकला आणि तडीपार करा’, असं बच्चू कडू म्हणाले. तर रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या वादावर बोलत असताना बच्चू कडू म्हणाले, रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याचे सरकारने परीक्षण करावं.. त्याची समाधी तिथे कशी आली? यावर माहिती घ्यावी. सरकार भांडण लावायचे काम करते. आमची समाधी घ्यायची वेळ आली, त्याचं काही नाही या देशात, असं म्हणत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोट ठेवले.