‘लग्न जुळायचंय तर मंगलकार्यालयाचं नाव कसं सांगू?’ बच्चू कडू यांना कशावर केलं मिश्किल भाष्य
VIDEO | महाविकास आघाडीसोबत की युतीसोबत निवडणूक लढवणार? प्रहार संघटनेचे प्रमुख आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी थेट सांगितलं, म्हणाले....
नागपूर, १८ ऑगस्ट २०२३ | महाविकास आघाडीसोबत का युतीसोबत निवडणूक लढवणार असा प्रश्न प्रहार संघटनेचे प्रमुख आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांना विचारण्यात आला असता त्यावर बच्चू कडू यांनी मिश्किल भाष्य केल्याचे समोर आले आहे. अजून लग्न जुळायचंय आहे, तारिख ठरायची आहे. त्याआधीच मंगलकार्यालयाचं नाव कसं सांगू, अशी मिश्किल प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. महाविकास आघाडीसोबत का युतीसोबत निवडणूक लढवणार याची अजून तारीख अजून ठरायची आहे. त्यामुळे तारीख ठरल्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ. अद्याप त्याबाबतच वातावरण तयार झालेले नाही, त्यामुळे आत्ताच निर्णय घेणार नाही. तर अजून लग्न जुळायचं आहे. तारिख ठरायची आहे. त्यामुळे आधीच मंगलकार्यालय कोणतं आहे ते कसं सांगू, असं भाष्य बच्चू कडू यांनी केले. पुढे ते असेही म्हणाले की, प्रहारची १५ जागांवर लढवण्याची तयारी आहे. पण आमचा सगळ्या दृष्टीकोणातून विचार झाला तर भाजपचा आम्ही विचार करू. प्रत्येकाने आपापलं घर जपायचं असते. घर न जपता काम सुरू केले तर पक्ष सोडून नुसती समाज सेवाच सुरू करावी लागेल, आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि राजकीय पद्धतीने आम्ही याला सामोरे जावू, अशी भूमिका त्यांनी मांडली.