धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले

| Updated on: Jan 31, 2023 | 10:25 AM

धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबला. बच्चू कडू यांनी सांगितले, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

लवकरच शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला मिळणार की ठाकरे गटाला हे ठरणार आहे, यावर प्रहारचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार आहे आमदार, खासदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संख्या ही शिंदे गटाकडे जास्त आहे. यापूर्वी धनुष्यबाणासंदर्भात जे निर्णय आले त्याचा विचार करता शिंदे गटाकडेच धनुष्यबाण जाणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी विचारणा करण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांनी धनुष्यबाणाचा निर्णय आला की लगेच दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले आहे. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबला आहे. मंत्रिमंडळ विस्तार करू नये, अशी कोणतीच सरकारची मानसिकता नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्ही भेट घेतली तेव्हा त्यांनीही मान्य केलं की एकाच व्यक्तीवर जास्त खात्याचा भार आहे त्यामुळे ताण येत आहे आणि महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Published on: Jan 31, 2023 10:23 AM
हुप्पा हुय्या ! माकडांनी केलं नागरिकांना सळो की पळो, बघा व्हिडीओ
यंदाच्या अर्थसंकल्पात हे असावं; नवनीत राणांनी अपेक्षा सांगितल्या…